उच्च दर्जाची ग्राहकसेवा – व्यवसायवृद्धीची गुरुकिल्ली

 

पुस्तकाविषयी थोडक्यात: ‘उच्च दर्जाची ग्राहकसेवा म्हणजे काय व अशा प्रकारची ग्राहकसेवा दिल्यास व्यवसायात व नफ्यात नक्कीच वाढ होते’ याविषयावरील महाराष्ट्रातील (किंवा देशातील!) हे पहिलेच पुस्तक असावे. प्रत्येक व्यावसायिक, विक्रेत्याने उच्च दर्जाची ग्राहकसेवा देऊन आपला व्यवसाय उत्तम प्रकारे कसा वाढवावा हे या पुस्तकातून अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पनेद्वारे तीस कथांच्या माध्यमातून सांगितले आहे. लेखकाने या तीस कथा छोटे उद्योग, घरगुती व्यावसायिक, महिला उद्योजक, नवउद्योजकांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिल्या आहेत. या कथांचा विषय लेखकाच्या प्रदीर्घ अभ्यासावर व प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहे. पुस्तकातील प्रत्येक कथेमधून व कथेच्या शेवटी त्या विषयाशी निगडीत पैलूंचे सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. ‘उच्च दर्जाची ग्राहकसेवा – व्यवसायवृद्धीची गुरुकिल्ली’ हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिकांना ‘उत्तम ग्राहकसेवा देऊन आपला व्यवसाय शाश्वतपणे कसा वाढवायचा’ याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन करेल.

 

या पुस्तकाच्या वाचनातून आणि अभ्यासातून व्यावसायिकांना होणारे फायदे:

  • ग्राहकसेवा ते उच्च दर्जाची ग्राहकसेवा कशी द्यावी या विषयीचे सखोल मार्गदर्शन
  • व्यवसाय वाढविण्यास प्रत्यक्ष मदत, नफा वाढविण्यास मार्गदर्शन
  • कमीतकमी खर्चात व्यवसायात जास्तीतजास्त वाढ
  • व्यवसाय सतत (शाश्वतपणे) वाढविण्याविषयीचे मार्गदर्शन

 

हे पुस्तक कोणासाठी: महाराष्ट्रातील सर्व उद्योजक, व्यावसायिक, विक्रेते, घरगुती व्यावसायिक, महिला उद्योजक, नवउद्योजक, शेती क्षेत्रातील व्यावसायिक आणि विक्री व विपणनक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी

 

 

पुस्तकाची किंमत:
रु. २५० + रु. ५० (कुरिअर चार्जेस महाराष्ट्रात) = रु. ३००

 

To get you copy, please contact!
Dr. Avinash Joshi (+91-9822037037)

 

 

 

 

 

 

उच्च दर्जाची ग्राहकसेवा – व्यवसायवृद्धीची गुरुकिल्ली